devendra fadanvis

राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा (marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रात (western Maharashtra) अतोनात नुकसान झाले याहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज लातूर, उस्मानाबाद दौऱ्याची पाहणी करणार आहेत.

उस्मानाबाद : राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा (marathwada) आणि पश्चिम महाराष्ट्रात (western Maharashtra) अतोनात नुकसान झाले याहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आज लातूर, उस्मानाबाद दौऱ्याची पाहणी करणार आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील बेगडा आणि तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा या गावातील नुकसानीची फडणवीस पाहणी करणार आहेत. दरम्यान काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीपासून नुकसान पाहणी दौरा सुरु केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लातुरात, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या.

सरकारने मदत द्यावी म्हणून सरकारवर दबाव निर्माण करु. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. विरोधात असताना आणि आमच्यासोबत असताना ते मागण्या करायचे. आता त्यांना ईश्वराने मदतीसाठी शक्ती दिली आहे. त्यांनी तातडीने मदत करावी. तातडीने मदत करण्यासाठी काहीही लागत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.