जिल्हाधिकारी कोरोना पाॅझिटिव्ह; प्रशासनात खळबळ

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत.

    उस्मानाबाद (Osmanabad).  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन आठवड्यापूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. लस घेतल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी घरीच उपचार घेत आहेत. जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस या महिन्याच्या सुरुवातीला घेतलेला होता.

    राज्यात कोरोनाची दुसरी मोठी लाट आली आहे. वैद्यकीय शास्त्रज्ञांनी कोरोना लस उपलब्ध करून देतात. प्रशासनाने तातडीने कोरोना लसिकरणाची मोहीम हाती घेतली. मात्र, कोरोना फोफावतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एका पोलिस कर्मचाÚयाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा आरोग्य तपासणी अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.