घरपोच ॲम्ब्युलन्स लसीकरण सेवा सुरू करा ; जनता दल(से)चे प्रवक्ते ॲड रेवण भोसले

वेगवान लसीकरण मोहिमेमुळे मृत्युदर व संसर्ग यामध्ये निश्चितच घट होईल. कोरोना आरोग्य संकटाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने आरोग्य यंत्रणासमोर मोठे आवाहन उभे असले तरी सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाचा सामना करणे व सरसकट सगळ्यांना मोफत लस टोचणे गरजेचे आहे.

    उस्मानाबाद: सध्या कोविड लसीकरण केंद्रासमोर लस घेण्यासाठी ज्येष्ठ व इतर नागरिकांच्या रांगा तसेच १८  ते ४४ वयोगटातील यंगस्टर्सचे कोरोना लसीकरण सुरू झाल्यामुळे लसीकरण केंद्रावर होणारी प्रचंड गर्दी थांबवण्यासाठी घरपोच ॲम्ब्युलन्स लसीकरण सर्विस सुरू करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

    कोरोना पसरण्याचा धोका कमी होईल
    या मोहिमेमुळे सरकारी लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होईल तसेच सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन होईल व कोरोना पसरण्याचा धोका कमी होईल ,त्यातच आता राज्य सरकारने सर्व खाजगी दवाखाने कोविड उपचारासाठी ताब्यात घेण्याचे नुकतेच आदेश दिल्यामुळे बहुतेक खाजगी हॉस्पिटलकडे असणाऱ्या ॲम्ब्युलन्सचा लसीकरणसाठी उपयोग होईल. प्रत्येक अँब्युलन्समध्ये एक डॉक्टर, दोन नर्स व  लसीकरण सामग्री ठेवण्यात यावेत .लस घेतल्यावर काही त्रास झाला तर त्या व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करता येणार आहे.

     घरपोच लसीकरण मोहीम
    वेगवान लसीकरण मोहिमेमुळे मृत्युदर व संसर्ग यामध्ये निश्चितच घट होईल. कोरोना आरोग्य संकटाची परिस्थिती गंभीर होत चालल्याने आरोग्य यंत्रणासमोर मोठे आवाहन उभे असले तरी सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना संसर्गाचा सामना करणे व सरसकट सगळ्यांना मोफत लस टोचणे गरजेचे आहे ,ती राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालय व दवाखान्यांमध्ये मोफत लस उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. राज्यात १८ ते ४४ या वयोगटात ५ कोटी ७१ लाख नागरिक असल्यामुळे घरपोच लसीकरण मोहीम राबविल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे तातडीने घरपोच अँब्युलन्स लसीकरण सर्विस सुरू करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.