sharad pawar marathwada tour

मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे कपाशी, ऊस, मका, बाजरी, तूर, पपई अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसाने (Rain) शेतकऱ्यांच्या (Farmers) हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान (Huge Loss Of Farmers)) झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले तसेच उभे पिक आडवे झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शेतकरी आता सरकारच्या तुटपूंज्या मदतीकडे पाहत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. ते नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. पाहणी करताना त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे कपाशी, ऊस, मका, बाजरी, तूर, पपई अशा अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा फटका पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. शरद पवार दोन दिवसाच्या मराठवाडा, विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना खचून न जाता सामर्थ्याने संकटाला तोंड देण्याचे आवाहन केले.

शेतकऱ्यांना शरद पवार म्हणाले की, धीर धरा आपण यातून मार्ग काढू, यातून आपण लवकरच बाहेर पडू आणि पुढे कष्टाने पुन्हा उभे राहू असे म्हणत शेतकऱ्यांना त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी असून शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत जाहीर करण्यात येईल. असे त्यांनी सांगितले. तसेच या येत्या १० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे देखील शरद पवार यांनी सांगितले आहे.