Life in danger for Tulja Bhavani's darshan; There is no action from the local administration when everyone starts arbitrarily

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर माजला आहे. असे असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक आपला जीव धोक्यात घालत आहेत. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. सर्वांची मनमानी सुरु असताना स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    उस्मानाबाद : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर माजला आहे. असे असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक आपला जीव धोक्यात घालत आहेत. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. सर्वांची मनमानी सुरु असताना स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि १द वर्षाखालील मुलांसह नवजात बालकांना प्रवेश देण्यास मनाई आहे. मात्र, असं असलं तरी या सगळ्यांना मंदिरात खुलेआम प्रवेश दिला जात आहे.

    मंदिरात दर्शनासाठी येणारे ५० टक्के भाविक विनामस्क मंदिरात येतात. तसेच मंदिरात सॅनिटायझिंग किंवा इतर उपाययोजना करताना मंदिर प्रशासन दिसत नाहीत. व्यापारी, पुजारी, भाविक देखील विनामास्क फिरत आहेत. असे असले तरी स्थानिक प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.