Life in danger for Tulja Bhavani's darshan; There is no action from the local administration when everyone starts arbitrarily

तुळजापूरच्या आई भवानीचे प्राचीन महात्म्य असलेले मंकावती तिर्थकुंड स्थानिक भाजपा नेत्यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्याने बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत तिर्थकुंडावर मालकी दाखवली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण आणि तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर ते तिर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो. मात्र याच तिर्थकुंडावर स्थानिक भाजप नेत्याची नजर पडली आणि त्यांने तो हडपण्याचा प्रयत्न केला.

    तुळजापूर : तुळजापूरच्या आई भवानीचे प्राचीन महात्म्य असलेले मंकावती तिर्थकुंड स्थानिक भाजपा नेत्यांनी हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्याने बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत तिर्थकुंडावर मालकी दाखवली. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण आणि तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.विष्णुभक्त श्री गौतम यांनी तुळजापूर येथे आल्यावर ते तिर्थकुंड बांधल्याचा दाखला दिला जातो. मात्र याच तिर्थकुंडावर स्थानिक भाजप नेत्याची नजर पडली आणि त्यांने तो हडपण्याचा प्रयत्न केला.

    बांधकामही केले

    भाजपचे स्थानिक नेते देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनी तिर्थकुंड हडपण्याचा प्रताप केला आहे. थेट आई भवानीचे तिर्थकुंड हडप करून अनेक ठिकाणी मोडतोड करून बांधकाम केले. बनवेगिरी व कागदपत्रात फेरफार करीत त्यांनी या तिर्थकुंडावर मालकी दाखवली आहे. मंकावती या भव्य तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी करून स्पष्ट झाले आहे. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे.

    फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश

    दुसरीकडे सरकारच्या नावे कागदपत्रामध्ये बदल व नोंदी करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश दिलेले आहेत. तर संबंधित व्यक्तींविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.