cm tour of usmanabad

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदतीची कोणती घोषणा करणार का याकडे शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. सोलापुरात दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांनी दिला होता. परंतु तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान (Huge loss Of Farmers) झाले आहे. काढणीला आलेली पिके परतीच्या पावसामुळे आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात सगळी नेते मंडळी राज्यात सर्व भागात दौरे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी सोलापूर दौऱ्यानंतर आता उस्मानाबाद दौऱ्यावर  (Uddhav Thackeray’s visit to Osmanabad today) रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते उस्मानाबाद जिल्ह्यात पोहचतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदतीची कोणती घोषणा करणार का याकडे शेतकऱ्यांसह जनतेचे लक्ष लागले आहे. सोलापुरात दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचा चेक मुख्यमंत्र्यांनी दिला होता. परंतु तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.