‘या’ कारणामुळे राज्यातील शाळा बंद राहण्याची शक्यता? शाळेबाबत संभ्रमाचं वातावरण

उस्मानाबाद: राज्य सरकारच्या (State Government) शालेय शिक्षण विभागाने शिपाई पदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्व शाळांनी बंद पुकारावा असं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी केलं आहे. शाळेत मुली असतात, तसेच संगणकांसह अनेक वस्तू असतात अशावेळी कंत्राटी शिपाई (Contract Peon) नेमल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतील. त्यामुळे राज्य सरकारनं शाळेतील शिपायांची पदं रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी आज राज्यातील शाळांनी बंद पाळावा असं आवाहन विक्रम काळे यांनी केलं आहे.

सरकारने ११ डिसेंबर २०२० रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाविरोधात आज उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवून जाहीर निषेध नोंदवावा असं आवाहन उस्मानाबाद जिल्हा खासगी शिक्षण संस्थाचालक संघानेही केलं आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांमधील शिपायांची पदं भरता येणार नाहीत. त्याऐवजी गरज असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या कंत्राटी तत्वावर शिपाई दिला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयावर सर्व स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

शासनाचा निर्णय काय?

राज्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला आहे. सध्या कार्यरत असलेलेल चतुर्थ श्रेणी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर ही पदे रद्द होतील. त्यांची नवीन भरती करण्याऐवजी शाळांना ठोक स्वरुपात शिपाई भत्ता दिला जाणार आहे