उस्मानाबादमध्ये पावसाचा कहर, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवण्यात यश, तर दोन जणं बेपत्ता

उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम विविध यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे.

    उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यात काल रात्री पावसाने कहर केला असून सततच्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले भरुन वाहिल्याने 2 वेगवेगळ्या घटनांत पाण्यात वाहून जाणाऱ्या 2 जणांना वाचवण्यात यश मिळले आहे तर बेपत्ता असलेल्या 2 जणांची शोध मोहीम सुरु आहे.

    उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव आणि समुद्रवाणी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे दोन व्यक्ती वाहून गेले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम विविध यंत्रणांच्या मदतीने सुरू आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे-बोरखेडा रस्त्यावरील ओढ्यातून बोरखेडा येथील ओढ्यावरील पुलावरून जाताना समीर युन्नूस शेख हे वाहून गेले आहेत. शेख हे मोटरसायकलवर होते. त्यावेळी एका शेतकऱ्याने त्यांना पाण्यात जाण्यास मनाई करूनही वाहत्या पाण्यात गेल्यामुळे ते वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.