sharad pawar

शरद पवार (Sharad Pawar) उस्मानाबाद येथे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ तोबा गर्दी (Surrounded by party member) केली होती. शरद पवार दाखल होताच कार्यकर्त्यांना त्यांना घेराव घातला. यावेळी शरद पवार त्यांना अंतर पाळण्यास (Social distance) सांगत होते. शरद पवार परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे (Rain) झालेल्या नुकसाणीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज उस्मानाबादेत दाखल झाले आहेत. शरद पवार हेलिकॉप्टरमधून (Helicopter) उतरताच आपल्या ताफ्याकडे गेले. ताफ्याकडे पोहचल्यावर शरद पवारांच्या भोवती कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना संकट असूनही सोशल डिस्टंन्स पाळले नाही. त्यामुळे शरद पवारांनी त्यांना दूर होण्यास आणि आंतर राखण्यास सांगितले.

मागील काही दिवस परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान (Huge loss Of Farmers) केले. शेतकऱ्यांचा आनंदावर परतीच्या पावसामुळे वीरजण पडले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पूराच्या पाण्यात वाहून गेली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज शरद पवास उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने ठीक ९.१५ मिनिटांनी उस्मानाबाद येथे दाखल झाले आहेत.

शरद पवार उस्मानाबाद येथे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी हेलिपॅडजवळ तोबा गर्दी केली होती. शरद पवार दाखल होताच कार्यकर्त्यांना त्यांना घेराव घातला. यावेळी शरद पवार त्यांना अंतर पाळण्यास सांगत होते. शरद पवार परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तुळजापूर, उमरगा, औसा, परांडा, उस्मानाबाद भागाची पाहणी करणार आहेत.