sharad pawar

शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये उमरगा-लोहारचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी आमदाराच्या सोनसाखळीवरच डल्ला मारल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे (Rain) शेतकऱ्यांचे प्रचंड (Huge loss Of farmers) नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद (Usmanabad) जिल्ह्यात गेले आहेत. उस्मानाबाद येथे शरद पवार सकाळी दाखल झाले आहेत. मात्र या दौऱ्याच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा चोरांनी (Thief)घेत आमदाराची सोन्याची चैन लांबवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

शरद पवारांच्या दौऱ्यामध्ये उमरगा-लोहारचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौघुले यांच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी आमदाराच्या सोनसाखळीवरच डल्ला मारल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या १० दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार यांनी दौऱ्याच्या सुरुवातीला लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.