उस्मानाबादमधील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण

याबाबत आमदारांनी स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे. आमदारांनी म्हटले आहे की, मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली. परिवारातील ६ सदस्य कोरोना बाधित आले.

उस्मानाबाद : भाजप आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्याने या आमदाराने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्हा आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या संगण्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु आहेत. कोरोना झालेल्या आमदाराचे नाव भाजप प्रदेश सरचिटणीस आणि आमदार सुजितसिंह ठाकुर आहे. त्यांच्यासोबत कुटूंबातील  अन्य ६ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

याबाबत आमदारांनी स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे. आमदारांनी म्हटले आहे की, मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कुटुंबातील सर्वांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केली. परिवारातील ६ सदस्य कोरोना बाधित आले. काल परत सदस्य व संपर्कातील सर्वांचे RT PCR केले. माझ्यासह परिवारातील आणखी ३ तर संपर्कातील ३ बाधित तर ३ अहवाल प्रतिक्षेत आहेत. माझ्यासह सर्वांची पकृती चांगली आहे. लक्षणे नाहीत. काळजी घेतो आहे. आपणही आपली व परिवाराची काळजी घ्यावी.

मी ३ ऑगस्टपासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नाही. काळजीपोटी अनेकांचे कॉल येतात. पण सर्व कॉल घेणे शक्य नाही. क्षमस्व. कृपया काही असल्यास SMS द्वारे कामाकरिता उपलब्ध असेन. माझ्यासह कोणालाही लक्षणे नाहीत. योग्य काळजी, उपचार आणि सर्वांचे प्रेम, सद्भावना आहेतच. आम्ही सर्व बरे होऊत. लवकरच बरा होऊन सेवा हाच संकल्प घेऊन सक्रीय असेन.