Life in danger for Tulja Bhavani's darshan; There is no action from the local administration when everyone starts arbitrarily

तुळजाभवानी देवीच्या पूजा या देवीचे महंत करतील मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. भाविकांनी न येण्याचे मंदीर प्रशासनाचे आवाहन केले असून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा. दरम्यान, मंदिर खुले मात्र, भाविकांना प्रवेश दिला न गेल्याने आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाबाबत पुजारी व व्यापाऱ्यात नाराजीचा सुर आहे. मंदिर खुले मात्र भाविक न आल्याने आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार असल्याची चर्चा आहे.

    उस्मानाबाद : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, काल कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन अभियान जाहीर केले आहे. त्यानुसार तुळजाभवानी मंदिर खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना दर्शनासाठी उद्यापासून मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.

    तुळजाभवानी देवीच्या पूजा या देवीचे महंत करतील मात्र भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार आहे. भाविकांनी न येण्याचे मंदीर प्रशासनाचे आवाहन केले असून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा. दरम्यान, मंदिर खुले मात्र, भाविकांना प्रवेश दिला न गेल्याने आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या निर्णयाबाबत पुजारी व व्यापाऱ्यात नाराजीचा सुर आहे. मंदिर खुले मात्र भाविक न आल्याने आर्थिक चक्र पुन्हा बिघडणार असल्याची चर्चा आहे.

    करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर 30 एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आणि श्री अंबाबाईचा रथोत्सव सुद्धा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. मंदिरामध्ये केवळ नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा सुरू राहणार असल्याचं देवस्थानाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.