yash-kgf

अभिनेता यश(actor yash) पुन्हा एकदा आपल्या रॉकी अवतारात येण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे आणि मोठ्या पडद्यावर आपल्या शरीराच्या योग्य प्रदर्शनासाठी उत्सुक आहे. त्याने आपल्या मेहनतीमध्ये कोणतीच कसर सोडली नसून ऑक्टोबरच्या मध्यात सुपरस्टार यश चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट आणि चित्रीकरणासंबंधित सर्व गोष्टी थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आता देशभरात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करण्यात येत असून, अनेकांनी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, केजीएफच्या(kgf) टीमनेदेखील आपल्या अन्य कलाकारांसोबत चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित सीक्वलच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली आहे. सुपरस्टार यशदेखील सेटवर परतण्यासाठी उत्सुक असून २५ दिवसांहुन अधिक काळ तो त्याच्या तयारीत व्यस्त आहे.

याविषयी अधिक माहिती देताना, अभिनेत्याच्या सूत्रांनी सांगितले की,  लॉकडाऊननंतर, यश(yash) केजीएफ २च्या (kgf 2) चित्रीकरणासाठी प्रचंड उत्सुक आहे. ज्या दिवशी, चित्रिकारणास सुरुवात झाली आहे तेव्हापासूनच यशने आपल्या ‘रॉकी भाय’च्या व्यक्तिरेखेसाठी आणि पूर्ववत फिजिकमध्ये परतण्यासाठी संपूर्ण ट्रेनिंगला सुरुवात केली आहे.

सूत्र पुढे सांगतात की, अभिनेता यश पुन्हा एकदा आपल्या रॉकी अवतारात येण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहे आणि मोठ्या पडद्यावर आपल्या शरीराच्या योग्य प्रदर्शनासाठी उत्सुक आहे. त्याने आपल्या मेहनतीमध्ये कोणतीच कसर सोडली नसून ऑक्टोबरच्या मध्यात सुपरस्टार यश चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे.

केजीएफ एक लोकप्रिय चित्रपट असून सुपरस्टार यशच्या पॅन-इंडिया फॅन फॉलोइंगच्या जोरावर या चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश संपादन केले आहे. पहिल्या भागाच्या सफलतेने केजीएफ २ ला केवळ दाक्षिणात्य वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण देशातील बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये नेऊन बसवले आहे. सुपरस्टार यश आणि केजीएफ चाहते पुन्हा एकदा त्यांच्या रॉकी भायची आतुरतेने वाट बघत आहेत.