‘या’ देशाचा राजकुमार वसवणार पर्यावरणपूरक शहर ; खर्च ऐकून व्हाल थक्क !!!!

शहराचा विकास करण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची असेल. १०० टक्के स्वच्छ वातावरण असणार आहे. इथल्या रहिवाशांना प्रदुषणमुक्त आरोग्य आणि अधिक स्थिर वातावरण मिळेल असा दावा केला आहे. त्या शहराचं विशेष म्हणजे या शहरात रस्ता किवा कार नसतील.

नियोम: जगातलं तेल संपल्यानंतर काय? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या दृष्टीने सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे पर्यावरणपूरक असे एक नवीन शहर वसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शहराचं ‘द लाइन’ असं नाव असेल. प्रिन्सने नियोम प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास १७२ किलोमीटर लांबीचं शहर वसवण्याची योजना बनवली आहे. शहराच्या निर्मितीला पुढच्या काही दिवसांमध्ये सुरुवात होईल. याची माहिती प्रिन्सने टीव्हीच्या माध्यमातून दिली.
शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात येत आहे सौदीचं हे नवं शहर १० लाख लोकसंख्येचं असेल. यामध्ये शाळा, आरोग्यकेंद्रासह इतर सुविधा असणार आहेत. याठिकाणी ३ लाख ८० हजार लोकांसाठी रोजगार उपलब्ध असेल. प्रिन्सने सांगितलं की या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी १०० ते २०० बिलियन डॉलर खर्च येईल. प्रिन्सने सांगितलं की,  शहरात एक वेगवान अशी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उभारली जाईल. या शहराचा विकास करण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची असेल. १०० टक्के स्वच्छ वातावरण असणार आहे. इथल्या रहिवाशांना प्रदुषणमुक्त आरोग्य आणि अधिक स्थिर वातावरण मिळेल असा दावा केला आहे. सौदी हा जगातील प्रमुख कच्च्या तेल निर्यातदार देशांपैकी आघाडीवर असलेला देश आहे. तसंच सर्वाधिक प्रदुषण असलेल्या देशातही सौदीचा वरचा क्रमांक लागलो. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे तेल संपल्यानंतर देशाचं भविष्य काय यादृष्टीने शहराची रचना करत आहेत. नियोम हे शहर २६,५०० वर्ग किलोमीटर क्षेत्रात असेल. याच्या सीमा जॉर्डन आणि मिस्रला लागून असतील.२०१७ नियोमच्या निर्मितीची घोषणा केली होती. सौदीच्या जीडीपीमध्ये २०३० पर्यंत या शहराचे योगदान जवळपास ४८ अब्ज डॉलर इतकं असेल.  विशेष म्हणजे या शहरात रस्ता किवा कार नसतील. नव्या शहरात शून्य कार्बन उत्सर्जन असेल.शहर लाल समुद्राच्या किनाऱ्यावर विकसित करण्यात येत आहे.  वेगवान अशी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उभारली जाईल. या शहराचा विकास करण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची असेल. १०० टक्के स्वच्छ वातावरण असणार आहे. इथल्या रहिवाशांना प्रदुषणमुक्त आरोग्य आणि अधिक स्थिर वातावरण मिळेल असा दावा केला आहे. त्या शहराचं विशेष म्हणजे या शहरात रस्ता किवा कार नसतील.