swara bhaskar

स्वराने अफगाणिस्ताच्या परिस्थितीवर मत मांडताना एक ट्विट केलं. यावेळी तिने तिथल्या परिस्थितीची तुलना भारतासोबत केली.

    अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वरा ट्रोल झाली आहे. अफगाणिस्ताच्या परिस्थितीवर मत मांडताना केलेल्या विधानामुळे स्वरा ट्रोल झाली आहे. त्यामुळे ट्विटरवर सध्या #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

    स्वराने अफगाणिस्ताच्या परिस्थितीवर मत मांडताना एक ट्विट केलं. यावेळी तिने तिथल्या परिस्थितीची तुलना भारतासोबत केली. यावेळी ती म्हणाली, “आपण हिंदुत्वाच्या दहशतीपासून वाचू शकत नाही. तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण झालाय. आपण सगळे हिंदुत्वाच्या आतंकवादावर नाराज होत असतो. त्यामुळे आपले मानवीय आणि नैतिक मूल्य हे दडपशाहीवर आधारीत नसले पाहिजे.”

    या ट्विटमुळे नेटकरी नाराज झाले आणि पुन्हा एकदा स्वराला ट्रोल करू लागले. काहींनी तर तिला अटक करण्याची मागणी केलीये. “स्वरा भास्करने आमच्या भावना दुखावल्या आहेत, तिला अटक करा”, अशी मागणीच एका युजरने कमेंट करत केलीय. तर काही यजुर्सनी तर तिला अफगाणीस्तानला पाठवा असा रिप्लाय केलाय.