nishabdam

अमेझॉन प्राईम(amazon prime) व्हिडीओने ‘निशब्दम’(nishabdam) या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरची(world premier) घोषणा केली. येत्या २ ऑक्टोबरला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर याचा वर्ल्ड प्रीमिअर होणार असून भारतातील प्राईम सदस्य आणि २०० हुन अधिक देश आणि प्रदेशांमध्ये या चित्रपटाला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम करता येणार आहे.

या चित्रपटात अनुष्का शेट्टी(anushka shetty), आर माधवन(r.madhavan) आणि अंजली यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत शालिनी पांडे, सुब्बाराजू आणि श्रीनिवास अवासराला, मायकल मॅडसेनदेखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. दिग्दर्शक हेमंत मधुकर दिग्दर्शित आणि कोना फिल्म कॉर्पोरेशनसोबत पीजी मीडिया फॅक्ट्रीचे टीजी विश्व प्रसाद यांच्याद्वारे निर्मित हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असून त्याचे कथानक एक मुकबधीर कलाकार, तिचा सेलिब्रिटी-संगीतकार पती आणि तिची खास मैत्रीण यांच्या अचानक गायब होण्याच्या आसपास फिरते. हा चित्रपट तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषेत असणार आहे.

अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने सांगितले की, साक्षी मी आत्तापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा भिन्न व्यक्तिरेखा आहे. ही एक अशी व्यक्तिरेखा आहे जिने मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढले, ही व्यक्तिरेखा साकारताना मला आनंद होत आहे.. माधवनसोबत काम करणे खरोखर आनंददायी होते, मी नेहमीच त्यांची चाहती राहिली आहे.

अभिनेता आर. माधवनने या चित्रपटाविषयी सांगितले की,  मला थ्रिलर चित्रपट पाहायला आणि त्याचा भाग व्हायला आवडते. अमेरिकेत सिएटल आणि अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चित्रित करण्यात आलेली ही कहाणी, वैश्विक प्रेक्षकांना नक्की आवडेल.

या चित्रपटातून अनुष्का शेट्टी आपले डिजिटल पदार्पण करत असून मायकल मॅडसेन भारतीय सिनेमा सृष्टीत पदार्पण करत आहे.