राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता?, राहुल गांधींच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

    कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतंच प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेनं जोर धरला आहे.

    २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तोडीसतोड आव्हान देण्यासाठी आणि देशातील प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची मोर्चेबांधणी करण्यासाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबतच्या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

    प्रशांत किशोर आणि गांधी कुटुंबियांमध्ये झालेली बैठक आगामी पंजाब किंवा उत्तर प्रदेश विधानसभेच्या मुद्द्यावरुन नसून त्याहूनही मोठी चर्चा या बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे.