मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट; युवकाचा मृत्यू

ही घटना उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता. मोबाईल त्याच्या हातातच होता. यावेळी अचानकपणे पॉवर बँकचा स्फोट झाला आणि घरात धावपळ उडाली.

    उमरिया – मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यात भयंकर घटना समोर आली आहे. येथे घरात मोबाईल चार्ज करताना पॉवर बँकचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घराच्या छताचे मोठे नुकसान झाले असून भिंतींवरही स्फोटाच्या खुना दिसत आहेत. तसेच, मोबाईल चार्ज करत असलेला युवकही या स्फोटात गंभीर जखमी झाला होता.

    ही घटना उमरिया जिल्ह्यातील छपरौड गावात घडली. गावातील 28 वर्षीय तरूण राम साहिल सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पॉवर बँकच्या सहाय्याने मोबाईल चार्ज करत होता. मोबाईल त्याच्या हातातच होता. यावेळी अचानकपणे पॉवर बँकचा स्फोट झाला आणि घरात धावपळ उडाली.

    या स्फोटामुळे घराच्या छताचे मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर काही ठिकाणी भिंतींनाही तडे गेले आहेत. याच बरोबर मोबाईल चार्ज करणारा तरूणही घरात जखमी अवस्थेत पडला होता. घटनेनंतर घरच्या मंडळींनी जखमी तरुणाला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. संबंधित पॉवर बँक नेमकी कोणत्या कंपनीची होती, हे अद्याप कळू शकलेले नाही