sai lokur

सईने फोटो शेअर करत लिहिले की, स्वर्गातून गाठी बांधल्या जातात, असे म्हणण्यासाठी माझ्याकडे खूप कारणे आहेत आणि अखेर मला माझा व्यक्ती मिळाला. सईने फोटो शेअर केला आहे ज्यात सई आणि तिचे ज्याच्यावर प्रेम आहे तो व्यक्ती पाठमोरे उभे आहेत. त्यामुळे सई कुणाच्या प्रेमात पडली आहे हे समजू शकलेले नाही.

बिग बॉस मराठी शोमधून अभिनेत्री सई लोकुर(sai lokur) घराघरांत पोहोचली. ती सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच ती फोटो व व्हीडिओ शेअर करत असते. मात्र, नुकतीच एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसेच आहे. सईने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितले आहे. तिने त्याच्यासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर(photo on instagram) शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

I have every reason to believe that matches are made in heaven. And I finally found mine… ❤️ #inlove😍

A post shared by Sai Lokur (@sai.lokur) on

सईने फोटो शेअर करत लिहिले की, स्वर्गातून गाठी बांधल्या जातात, असे म्हणण्यासाठी माझ्याकडे खूप कारणे आहेत आणि अखेर मला माझा व्यक्ती मिळाला. सईने फोटो शेअर केला आहे ज्यात सई आणि तिचे ज्याच्यावर प्रेम आहे तो व्यक्ती पाठमोरे उभे आहेत. त्यामुळे सई कुणाच्या प्रेमात पडली आहे हे समजू शकलेले नाही. मात्र, ती लवकरच याबद्दल सांगेल अशी आशा करता येईल.

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरांत पोहोचली. सईने तिच्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात तिची आई वीणा लोकुर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.