जगातील ‘ही’ होती सर्वात कुरूप महिला ; तिला पाहण्यासाठी लोक मोजायचे हवे तितके पैसे

पुरुषासारख्या दिसणाऱ्या या महिलेला पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. तिला सर्कशीत पाहण्यासाठी लोक पैसे मोजून येऊ लागले. लोक तिचा अपमान करत आणि त्यासाठी तिला पैसेही देत.

  स्वतःच्या सौंदर्याबाबत जगभरातील महिला कायम सर्तक असलेल्या पाहायला मिळतात. आपण अधिकाधिक सुंदर दिसावे यासाठी हरएक तऱ्हेचे प्रयत्न महिला करतात. मात्र जगात अशी एक मी महिला होऊन गेली जिला सुंदरतेसाठी नव्हे तर जगातील सर्वात कुरूप महिला(Ugliest Woman In World) म्हणून पुरस्कार मिळाला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिलेला हा किताब मिळाल्यामुळे दुःख नव्हे तर आनंदच होत होता.

  कोण होती महिला

  मेरी अॅन असे त्या महिलेचे नाव असून डिसेंबर १८७४ ला तिचा जन्म पूर्व लंडनमधील प्लेस्टोव येथे झाला होता. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मेरीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत नर्सिंगमध्ये डिग्री मिळवली होती. पुढे लग्न होऊन चार मुले झाल्यानंतर मेरीच्या चेहऱ्यात वेगळाच बदल होऊ लागल्याचे समोर आले आहे. पुढे असाचबदल शरीराच्या प्रत्येक भागात होऊ लागला. सुरूवातीला नेमक काय होतंय याचा तिला अंदाज येत नव्हता व कळतही नव्हते. परंतु शरीरातील हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेतिला आजार जडल्याचे समोर आले. त्यामुळेच तिचा चेहरा विद्रुप बनला होता.

  तिला झालेल्याआजराचं नाव Acromegaly Disorder असं होतं. त्यात मानवाच्या शरीरातल्या काही अवयवांचा आकार अनेक पटींनी वाढतो. या विकारात शरीरातल्या हाडांचाही आकार प्रचंड वाढतो. अशा रुग्णाच्या हातापायांसह चेहऱ्याचाही आकार वाढतो. मेरीचा चेहरा भयंकर झाला होता. अचानक ती पुरुषांसारखी दिसू लागली होती.

  कुरूपतेमुळे तिला कुठेही काम मिळत नव्हतं. पण पेपरमधल्या एका जाहिरातीने तिचं आयुष्य बदललं. ती जाहिरात होती क्लॉउडे बर्टरम नावाच्या एका सर्कसच्या मालकाची. तो लोकांना हसवण्यासाठी कुरूप दिसणाऱ्या महिलेला सर्कशीत आणू इच्छित होता. मेरीने यासाठी अर्ज केला आणि तिथे ती निवडली गेली. तेव्हापासून ती सर्कसमध्ये लोकांना हसवायचं काम करू लागली.

  पुरुषासारख्या दिसणाऱ्या या महिलेला पाहण्याची उत्सुकता अनेकांना होती. तिला सर्कशीत पाहण्यासाठी लोक पैसे मोजून येऊ लागले. लोक तिचा अपमान करत आणि त्यासाठी तिला पैसेही देत. आपल्या चार मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ती स्वतःचा होणारा अपमान सहन करत होती आणि पैसे कमवत होती. पुढे याच विकाराने तिचा मृत्यू झाला.