तर त्यांनी तुमच्या गाडीला हात लावलाच कसा ? जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणी ममतांचा पलटवार

केेंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणावरून भाजपा आणि तृणमूल काॅंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नडडा यांच्यावरील हल्ला सुनियोजित असल्याची शक्यता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वर्तविली आहे. त्या म्हणाल्या, "तुमच्याकडे सीआयएसएफ-बीएसएफचे एवढे कमांडो आहेत. तर त्यांनी तुमच्या गाडीला हात कसा लावला. तिथे तुमच्या सोबत असणाऱ्यांनी गोळीबार केला त्याचं काय?,” असे प्रश्न ममता यांनी उपस्थित केलं आहे. काल गोळी लागल्याने भाजपाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यक्तीला ज्या बंदुकीमधून गोळी लागली तशा बंदुकी पोलीस खात्याकडून वापरल्या जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

कोलकाता (Kolkata). केेंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ला प्रकरणावरून भाजपा आणि तृणमूल काॅंग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. नडडा यांच्यावरील हल्ला सुनियोजित असल्याची शक्यता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वर्तविली आहे. त्या म्हणाल्या, “तुमच्याकडे सीआयएसएफ-बीएसएफचे एवढे कमांडो आहेत. तर त्यांनी तुमच्या गाडीला हात कसा लावला. तिथे तुमच्या सोबत असणाऱ्यांनी गोळीबार केला त्याचं काय?,” असे प्रश्न ममता यांनी उपस्थित केलं आहे. काल गोळी लागल्याने भाजपाच्या एका कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ममता यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या व्यक्तीला ज्या बंदुकीमधून गोळी लागली तशा बंदुकी पोलीस खात्याकडून वापरल्या जात नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी भाजपावर निशाणा साधला. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्यानंतर ममता यांनी सर्व केंद्रीय यंत्रणा हाताशी असताना भाजपाला स्वत:च्या पक्षाध्यक्षांचे संरक्षण करता येत नाही, याबद्दल आश्चर्य वाटत असल्याचं म्हटलं आहे. तसेच ममता यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा नियोजित असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. “तिथे एक छोटा अपघात झाला होता. हा ताफा ज्या रस्त्यावर येत होता त्या रस्त्यावरील एका चहाच्या टपरीजवळ ताफ्यातील ५० गाड्यांपैकी एका गाडीने कोणाला तरी धडक दिली किंवा त्या गाडीच्या दिशेने काहीतरी फेकण्यात आलं किंवा हे नियोजित होतं. पोलीस यासंदर्भात तपास करत आहेत. आम्ही तुमचे खोटे दावे सहन करणार नाही. आता हे अती होतं आहे,” अशा शब्दांमध्ये ममतांनी भाजपावर पलटवार केला.

गुरुवारी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा ममता बॅनर्जींचे समर्थक आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला जात आहे. डायमंड हार्बरला जाताना नड्डा यांच्या गाडीवर हल्ला झाला. हल्ला झाला तो परिसर तृणमूलचे खासदार आणि ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे.

या हल्ल्यानंतर भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी तृणमूलवर निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. झे प्लस सुरक्षा असताना नक्की काय गोंधळ झाला याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आलेत.

“ते नवा हिंदू धर्म लागू करु पाहत आहेत. त्यांचा हिंदू धर्म आपला आमचा हिंदू धर्म नाही. ते जो धर्म लादू पाहत आहेत तो हिंदू धर्म नाही. त्याच्या या धर्माशी माझा तसेच तुमचाही काही संबंध नाही. अशाच पद्धतीने हिटलर मोठा झाला होता. चाउसेस्कू, मुसोलिनी सारखे हुकूमशाह मोठे झाले होते. आज नरेंद्र बाबू सरकार (हल्ल्याच्या) नाटकाचं नियोजन करते, नाटक करते आणि या नाटकाचे व्हिडीओ प्रसारमाध्यमांना पाठवते आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांकडे त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद नाहीय. प्रसारमाध्यमे त्यांनी पाठवलेल्या नाटकांमध्ये स्वत:च्या नाटकांचा समावेश करुन ती दाखवतात,” अशा शब्दांमध्ये ममता यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.