गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर अयान्ना विल्यम्सला ‘या’ कारणामुळे कापावी लागली २४ फूट वाढलेली नखं!

विल्यम्स यांना नखांची निगा राखण्यासाठी जवळपास दोन बाटल्या पॉलिश लागायं. गेल्या आठवड्यात त्यांनी नखे काढली. त्याआधी त्यांच्या नखांची लांबी होती २४ फूट ०.७ इंच. त्यामुळे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला,

    अयान्ना विल्यम्स यांच्या हातांच्या बोटांची सर्वांत लांब नखे वाढवल्याबद्दल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवण्यात आलं होतं. अयान्ना विल्यम्स यांनी ३० वर्षांत प्रथमच ती नखं कापली आहेत. २०१७ मध्ये विल्यम्स यांच्या नखांची लांबी १९ फूट आणि १०.९ इंच एवढी झाली तेव्हा त्यांनी विक्रम मोडला.

    विल्यम्स यांना नखांची निगा राखण्यासाठी जवळपास दोन बाटल्या पॉलिश लागायं. गेल्या आठवड्यात त्यांनी नखे काढली. त्याआधी त्यांच्या नखांची लांबी होती २४ फूट ०.७ इंच. त्यामुळे त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटले. टेक्सास येथील फोर्थ वर्थमधील ट्रिनिटी व्हिस्टा डर्माटोलॉजीचे डॉ. ॲल्लीसन रिडिंजर यांनी इलेक्ट्रिक रोटरी उपकरणाने ही नखे कापली.

    “काही दशके मी ही नखे वाढवत आली आहे. मी आता नव्या आयुष्यासाठी तयार आहे. मी नखे गमावणार आहे याची मला कल्पना आहे; पण आता त्यांची जाण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत अयान्ना विल्यम्स यांनी भावना व्यक्त केल्या होत्या, असे गिनीस वर्ल्ड रेकॉर्डसने म्हटलं आहे.