हॅशटॅग ‘ये हमारी पवरी हो रही है’ चा सोशल मीडियावर धुमाकूळ

ये हमारी पवरी हो रही है'  हा पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने ट्रेंड होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडीओच्या आधारे अनके क्रिएटिव्ह मीम्स तयार केले जात आहे. समाज माध्यमांवरील या व्हडिओची भुरळ केवळ नेटकऱ्यांचं नाहीत तर विविध क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँडनाही पडली आहे. त्यांनीही या व्हिडीओच्या आधारे मीम्स तयार केले आहेत.

    सोशल मीडियावर नेटीझन्सला कुठली पोस्ट कधी आवडेल आणि ती कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून “ये हमारी कार है, ये हम हैं, और ये हमारी पवरी हो रही है’  हा पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने ट्रेंड होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर या व्हिडीओच्या आधारे अनके क्रिएटिव्ह मीम्स तयार केले जात आहे. समाज माध्यमांवरील या व्हडिओची भुरळ केवळ नेटकऱ्यांचं नाहीत तर विविध क्षेत्रातील प्रसिद्ध ब्रँडनाही पडली आहे. त्यांनीही या व्हिडीओच्या आधारे मीम्स तयार केले आहेत.

    इंटरनेटवरील मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम असलेल्या नेटफिलिक्सने प्रसिद्ध चित्रपटाचे फोट शेअर करत ‘ये हमारी कार है, ये हम हैं, और ये हमारी पार्टी हो रही है, होम वी आर नॉट टू लेट द पार्टी’ असा मेसेज लिहाल आहे. तर ‘डॉमिनोज इंडिया’ नेही आपलया इन्स्ट्राग्रामवर पिझ्झावर ५० टक्के सूटचे व त्या खालोखाल यहा हमारी पार्टी हो रही अशी कॅप्शन दिले आहे. डोमिनोज पिझ्झा पार्टीसाठी आपल्या आवडीच्या पिझ्झा ऑर्डर करण्यास विसरू नका आणि सर्व ऑर्डरवर ५०टक्के पर्यंत सूट मिळवा, हॅशटॅग पावरी हो रही है असेही लिहिले आहे.  इतकच नव्हे तर ‘ओयोरूम्स’ या ट्रॅव्हल कंपनीने व ऑनलाईन फूड मधील सर्वात प्रसिद्ध ‘स्वीगी’ नेही वाटाण्याच्या शेंगा व मटर पनीरचा फोटो शेअर करत ‘यहा पावरी हो रही है’ असे मीम्स टाकले आहे.

    अनेक कलाकारांनीही चित्रपट, मालिकांच्या पात्रांच्या मदतीने मीम्स तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. डॅनॅनिरने तिच्या मित्रमैत्रिणींसह मजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा ट्रेंड सुरू झाला.