watch video: हरणाला पाहून जंगलाच्या राजाने ठोकली धूम

. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं रस्ता ओलांडण्यासाठी एक हरीण वेगाने धावत आलं आहे. यावेळी या हरणाला पाहून सिंह देखील घाबरला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक हरीण वेगात रस्ता पार करताना दिसत आहे.

    सिंह अनेकदा मोठं मोठ्या प्राण्यांनाही काही क्षणातचं जेरीस आणू शकतो. आपल्या चपळाईने शिकार करण्यासाठी सिंहाला ओळखलं जातं. सोशल मीडियावर एका व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये चक्क हरणाला घाबरून सिंह घाबरल्याचे दिसून आले आहे.
    या व्हिडीओ मध्ये एक हरीण अचानक सिंहाच्या समोरचं आलं आहे. हरीणाच्या थेट येण्याने, इतर वेळी डरकाळी फोडून इतर प्राण्यांना घाबरवणारा सिंह स्वतःच घाबरला आहे. हा व्हिडिओ लाइफ अँड नेचर नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

    जंगलातील एका रस्त्याने चार सिंह अगदी राजेशाही थाटात डुलत डुलत जात आहेत. या रस्तावर काही वाहनं देखील उभी आहेत. समोर कारमध्ये बसलेला व्यक्ती आपल्याला इजा पोहचवेल, याची थोडीही भीती न बाळगता हे सिंह निर्भयपणे रस्त्यावर चालत आहेत. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं रस्ता ओलांडण्यासाठी एक हरीण वेगाने धावत आलं आहे. यावेळी या हरणाला पाहून सिंह देखील घाबरला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक हरीण वेगात रस्ता पार करताना दिसत आहे. पण हरणाला रस्त्यावर सिंहाचा कळप दिसल्यानंतर एका क्षणासाठी हरीण घाबरलं आहेच. पण दुसरीकडे सिंह देखील घाबरला आहे. यावेळी सिंहाला काही सुचण्याच्या अगोदर हरणाने सिंहाच्या अंगावरून उडी घेत धूम ठोकली आहे.