बाहुबलीला तुरुंगात हवा टीव्ही

संपूर्ण राज्यात कैद्यांना टीव्ही पाहू दिला जातो. पण, मला टीव्हीपासून दूर ठेवले जात आहे. मी खेळाडू आहे, मला सध्या सुरू असलेला यूरो 2020 फुटबॉल कप पाहायचा आहे. मला टीव्ही पाहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्तार अन्सारीने न्यायाधिशांना केली.

    बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बांदाच्या तुरुंगात कैद असलेल्या बाहुबली बसपा आमदार मुख्तार अन्सारीने सुनावणीदरम्यान परत एकदा तुरुंगात टीव्ही पाहू देण्याची मागणी केली. बनावट अॅम्ब्युलन्सप्रकरणात झालेल्या व्हर्चुअल सुनावणीदरम्यान मुख्तार अंसारीने स्वतः खेळाडू असल्याचे सांगत न्यायाधीशांकडे यूरोपमध्ये सुरू असलेला यूरो-2020 फुटबॉल चषक पाहण्यासाठी टीव्ही देण्याची मागणी केली.

    संपूर्ण राज्यात कैद्यांना टीव्ही पाहू दिला जातो. पण, मला टीव्हीपासून दूर ठेवले जात आहे. मी खेळाडू आहे, मला सध्या सुरू असलेला यूरो 2020 फुटबॉल कप पाहायचा आहे. मला टीव्ही पाहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्तार अन्सारीने न्यायाधिशांना केली.

    मी 16 वर्षांपासून तुरुंगात कैद असून, फक्त राज्यकीय द्वेषापोटी या प्रकरणात अडकवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.