जमिनीखाली साठवला होता १ हजार ३५० किलो गांजा, पोलिसांनी केला जप्त

कलबर्गी जवळील कलगी येथे जमिनीखाली साठवलेला १ हजार ३५० किलो गांजा बंगळुरु पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात ४ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

कलगीमधील शेळीच्या फर्ममध्ये गांजा(ganja) साठवला जात असल्याची माहिती बंगळुरु पोलिसांना(bengluru police) मिळाली होती. लगेच पोलिसांनी धडक कारवाई केली. त्यानंतर गांजा जप्त(ganja seized) करण्यात आला. अटक केलेल्या ४ व्यक्तींपैकी एकजण रिक्षा चालक आहे. हा रिक्षाचालक विद्यार्थांना गांजा पुरवत असल्याची माहिती मिळाली आहे.  ज्ञानशेखर असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ओरिसा राज्यातून कर्नाटक राज्यामध्ये ट्रकमधून गांजा आणण्याचे काम सुरु होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी यावर कारवाई केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकात या गांजाच्या पुरवठ्याचे काम सुरु होते.