विशाखापट्टणममध्ये क्रेन कोसळल्याने १० मजूर ठार…

  • विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये आज शनिवारी या क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. परंतु काही अधिकारी आणि ऑपरेटर्स त्याची पाहणी करीत असताना अचानक क्रेन खाली कोसळली. या दुर्घटनेत १० मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती डीसीपी सुरेश बाबू यांनी दिली.

विशाखापट्टणम: विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड परिसरात अचानक क्रेन कोसळल्यानं मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही क्रेन अंगावर कोसळल्यानं या भागात काम करणाऱ्या १० मजूरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे येथील परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. परंतु मदत आणि बचाव कार्य सुरू असून या क्रेनखाली काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये आज शनिवारी या क्रेनच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. परंतु काही अधिकारी आणि ऑपरेटर्स त्याची पाहणी करीत असताना अचानक क्रेन खाली कोसळली. या दुर्घटनेत १० मजूरांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती डीसीपी सुरेश बाबू यांनी दिली. त्यानंतर या जखमी मजूराला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत सहा मृतदेह क्रेनखालून बाहेर काढण्यात यश आल्याचं सांगितलं जात आहे.