bogus voting card

हिमाचल प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच अनेक ठिकाणी मतदारयादीमध्ये(voter list) घोळ झाल्याचे समोर आले आहे. 

हिमाचल प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अशातच अनेक ठिकाणी मतदारयादीमध्ये(voter list) घोळ झाल्याचे समोर आले आहे.  ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्ये एक विचित्र घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.

टाहलीवाल में एक ही मकान एवं पते पर बना दी 102 वोटे,जिनमे अधिकांश प्रवासी। यूँ किया वोटों का गोरखधंधा।

Posted by Mukesh Agnihotri on Tuesday, January 12, 2021

या फेसबुक पोस्टद्वारे टाहलीवाल यांनी मतदारयादीचा फोटो शेअऱ केला आहे. तसेच एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी आहेत. अग्निहोत्री यांनीच याच कारणामुळे मतदारयादीमध्ये मोठा घोळ अशल्याचा आरोप केला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे. कोणी तक्रार केल्यास यासंदर्भात कारवाई केली जाईल असंही चौधरी यांनी सांगितलं आहे.याआधीही हिमाचलमध्ये मतदार यादीत घोळ झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.