राम मंदिरासाठी ‘या’ माजी मुख्यमंत्र्याच्या सुनेकडून ११ लाखाचे दान

अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर समाजवादी पार्टीने भाजपवर टीका केली आहे. त्याचवेळी कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेले समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी या मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे.

    लखनौ (Lucknow).  अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या निधी संकलनावर समाजवादी पार्टीने भाजपवर टीका केली आहे. त्याचवेळी कारसेवकांवर गोळीबार केल्याचा आरोप असलेले समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी या मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली आहे. यावेळी त्यांनी मुलायम यांच्या कार्यकाळात कारसेवकांवर झालेल्या गोळीबारावरही मत व्यक्त केले आहे.

    अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्मितीसाठी देशभर निधी संकलन मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून अवध प्रांताचे प्रचारक कौशल आणि कार्यवाह प्रशांत भाटिया हे अपर्णा यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिरासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली.

    राम मंदिर हा आमच्या आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यासाठी आम्ही अयोध्येतील राम मंदिरासाठी स्वच्छेने 11 लाख रुपये दिले आहेत. राम हा देशाचे चरित्र, संस्कार आणि सर्व प्रकारच्या आस्थेचे केंद्र आहे. हे देशाचे मंदिर आहे. प्रत्येकाने या मंदिरासाठी दान द्यायला हवे. -- अपर्णा यादव