charas

हिमाचल प्रदेशमधील(himachal pradesh) कुल्लू पोलिसांना(kullu police) अमली पदार्थांविरोधातील मोहीमेत मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी शिजाहू गावातून तब्बल १११ किलोंचा चरस जप्त(charas seized) केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील(himachal pradesh) कुल्लू पोलिसांना(kullu police) अमली पदार्थांविरोधातील मोहीमेत मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी शिजाहू गावातून तब्बल १११ किलोंचा चरस जप्त(charas seized) केला आहे. या प्रकरणामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात चरस सापडल्याने पोलिसांनी संपूर्ण गावचं सील केलं आहे.

पोलिसांना या गावामध्ये एक चरस माफिया असल्याचा सुगावा लागला. पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. यात पोलिसांनी एका पुरुषासहीत महिलेलाही अटक केली आहे. या दोघांविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्टच्या (अमली पदार्थविरोधी कायदा) २० व्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात कुल्लूचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह म्हणाले की, बंजारचे पोलीस उपाधीक्षक बिन्नी मिन्हास यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. याआधीही अशी कारवाई झाली होती. मात्र यंदा सापडलेल्या साठ्याचे प्रमाण हे जास्त आहे.  या प्रकरणात अद्याप दोन जणांना अटक करण्यात आली आहे.