12 killed, 25 injured in bus-tanker accident

धुक्यामुळे असे अपघात होत असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. काही अंतरावरच्या वस्तू देखील दिसत नव्हत्या. दरम्यान, बस आणि गॅस टँकर समोरासमोर धडकले. ही धडक खूप जोरदार होती.

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील संभळ येथे भरधाव बस आणि टँकरमद्ये भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील धुक्यामुळे प्रवासी बसला समोरील टँकर न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याचे कळते आहे. हा अपघात सकाळी घडला असून यामध्ये १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

ही घटना आज पहाटेची आहे. धुक्यामुळे असे अपघात होत असल्याचे असल्याचे सांगितले जात आहे. सकाळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती. काही अंतरावरच्या वस्तू देखील दिसत नव्हत्या. दरम्यान, बस आणि गॅस टँकर समोरासमोर धडकले. ही धडक खूप जोरदार होती. सुरुवातीला सात जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, त्यानंतर आणखी बरेच जखमी मरण पावले. आणि मृतांची संख्या १२ झाली. बहुतांश प्रवासी बसचे प्रवासी आहेत.

बरेच लोक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. सीएम योगी यांनी घटनेची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडितांना मदत करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत जिल्हा अधिकाऱ्यांना बचाव व मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. अनेक अधिकारी आणि पोलिस घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात पोचवत होते.