1250 kg fish, 1000 kg vegetables, 250 kg sweets, 10 goats; Strange gift given by the bride's father

राजमुंदरी येथील प्रख्यात व्यावसायिक बतूला बलराम कृष्ण यांनी आपल्या मुलीला 1250 किलो मासे, 1000 किलो भाज्या, 250 किलो किराणा सामान, 250 किलो लोणचे, 250 किलो मिठाई, 50 कोंबड्या, 10 शेळ्या पुडुचेरीतील यानम येथे मुलीला पाठवल्या आहेत. यानम येथील प्रसिद्ध उद्योगपतींचा मुलगा पवन कुमार यांनी नुकतेच बतूला बलराम कृष्णा यांची मुलगी प्रत्यूषा सोबत लग्न केले आहे.

    हैदराबाद : आंध्रप्रदेशमध्ये वडिलांनी आपल्या नवविवाहित मुलीला अनोखी भेट दिली आहे. तेलगू परंपरेनुसार सध्या आषाढ महिना सुरू आहे. यादरम्यान वडील आपल्या मुलीला भेट देत असतात. असाच एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका वडिलांनी मुलीला मोठ्या प्रमाणात मासे, भाज्या, लोणचे आणि मिठाई भेट म्हणून दिली. नवविवाहितांसाठी हा महत्त्वाचा महिना आहे. परंपरेनुसार या काळात नवीन वधू तिच्या पालकांकडून भेटवस्तू घेतात. आंध्रप्रदेशमध्ये वडिलांनी मुलीला दिलेली भेट एक चर्चेचा विषय बनला आहे.

    राजमुंदरी येथील प्रख्यात व्यावसायिक बतूला बलराम कृष्ण यांनी आपल्या मुलीला 1250 किलो मासे, 1000 किलो भाज्या, 250 किलो किराणा सामान, 250 किलो लोणचे, 250 किलो मिठाई, 50 कोंबड्या, 10 शेळ्या पुडुचेरीतील यानम येथे मुलीला पाठवल्या आहेत. यानम येथील प्रसिद्ध उद्योगपतींचा मुलगा पवन कुमार यांनी नुकतेच बतूला बलराम कृष्णा यांची मुलगी प्रत्यूषा सोबत लग्न केले आहे.

    जोडप्याचा हा पहिला आषाढी मास आहे. म्हणून प्रत्युषाच्या वडिलांनी आपल्या मुलीला अनोखी भेट देण्याचा निर्णय घेतला. भेटवस्तूंनी भरलेला ट्रक प्रत्युषाच्या सासरच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांनाही मोठा धक्का बसला.