कोरोनाचे थैमान सुरुच ,कर्नाटकमध्ये १४ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा

कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यात आणखी एका राज्याची तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन (lockdown in karnataka) लावण्याचा निर्णय घेतला आहे.

    कोरोनाचा प्रादुर्भाव(corona spread) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. आता यात आणखी एका राज्याची तर काही राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. आता कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊन (lockdown in karnataka) लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे २७ एप्रिलपासून कर्नाटकमध्ये १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. उद्या रात्रीपासून लॉकडाऊनचे निर्बंध लागू होणार आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, अत्यावश्यक सेवांना या लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. दुकानं सकाळी ६ ते सकाळी १० वाजेपर्यंत सुरु असतील. त्या व्यतिरिक्त इतर सेवा पूर्णपणे बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. तर बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्राला परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. त्याचबरोबर राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासाची परवानगी नसल्याचे समजते. अत्यावश्यक कारणांसाठी प्रवासाला सूट दिली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.  दारुच्या होम डिलिव्हरीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

    कर्नाटक देशातील तिसरं कोरोना प्रभावित राज्य आहे. कर्नाटकमध्ये आत्तापर्यंत १४ हजारांहून अधिक जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये एका दिवसामध्ये २९,४३८ रुग्णांची नोंद झाल्याने प्रशासन खडबडून जागं झालं आहे. यापूर्वी दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन  आहे.