बस-ट्रक धडकेत १४ प्रवासी ठार; भीषण अपघातात ट्रकचा चक्काचूर

गुरुवारी पहाटे 5.00 वाजताच्या सुमारास लखनौपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर देवा स्टेशन परिसरातील माती रोडवर हा अपघात झाला. वाळूने भरलेल्या आणि चुकीच्या बाजुने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या व्होल्वो बसला जोरदार धडक दिली.

    बाराबंकी (Barabanki). उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बाराबंकी जिल्ह्यात (Barabanki district) गुरुवारी पहाटे एक भीषण रस्ते अपघात झाला. डबलडेकर व्होल्वो बस आणि ट्रकमध्ये झालेल्या जोरदार धडकेत 14 जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास 27 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बस आणि ट्रकमध्ये धडक झाल्यानंतर अवाढव्य ट्रकचाही चक्काचूर झाला.

    गुरुवारी पहाटे 5.00 वाजताच्या सुमारास लखनौपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर देवा स्टेशन परिसरातील माती रोडवर हा अपघात झाला. वाळूने भरलेल्या आणि चुकीच्या बाजुने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या व्होल्वो बसला जोरदार धडक दिली. डबलडेकर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अपघातामुळे जोरदार झटका बसला. या अपघातानंतर वाहनचालकानं घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले जात आहे. जखमींना बाराबंकीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करणयात आले आहे. काही जखमी प्रवाशांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.