14 patients of ‘Zika’ virus in Kerala

केरळमध्ये एक 24 वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणूने बाधित झाली असल्याची माहिती केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली होती. याचबरोबर तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी 19 संशयित रुग्ण होते. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 जणांचे नमुने झिका पॉझिटीव्ह आढळले.

    तिरुअनंतपुरम : करोनाचे संकट असतानाच आणखी एका विषाणूने तोंड वर काढल्याचे बघायला मिळाले आहे. झिका विषाणूचे रुग्ण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण काल केरळ मध्ये मिळाला होता. दरम्यान शुक्रवारी या विषाणूचे केरळमध्ये 13 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

    केरळमध्ये एक 24 वर्षीय गर्भवती महिला झिका विषाणूने बाधित झाली असल्याची माहिती केरळचे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली होती. याचबरोबर तिरुअनंतपुरममधून झिका विषाणूचे आणखी 19 संशयित रुग्ण होते. या रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने घेऊन ते पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 13 जणांचे नमुने झिका पॉझिटीव्ह आढळले.

    केरळात झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅलर्ट जारी करीत केंद्र सरकारने सहा तज्ञांचे पथक केरळमध्ये पाठवले आहे. तेथील झिकाच्या फैलावावर लक्ष ठेवण्याबरोबरच केरळ सरकारला मदत करण्यासाठी हे पथक सक्रिय राहणार आहे. पथकामध्ये सार्वजनिक आरोग्य क्षेत्र तसेच साथरोगाचे तज्ञ आणि एम्सच्या वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश असेल.