इलेक्शन ड्युटी जीवघेणी ठरली, मध्य प्रदेशात निवडणुकीमुळे कोरोना होऊन १७ शिक्षकांनी गमावले प्राण

निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह (Damoh)जिल्ह्यातील ८०० शिक्षकांची ड्युटी(teacher`s Election Duty) लावण्यात आली होती.ड्युटीवर असलेल्या कमीत कमी १७ जणांनी कोरोनामुळे(Corona) आपले प्राण गमावले आहेत.

    संपुर्ण देशात कोरोनामुळे(Corona) भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक नियम घालण्यात आले आहेत. मात्र राजकीय मंडळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत आहेत. तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान १५ शिक्षक कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.तसेच अनेकांना कोरोनाची लागण झाली. मध्य प्रदेशातही(Madhya Pradesh) अशीच घटना समोर आली आहे.

    निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील ८०० शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी २०० शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर कोरोनाची लागण झाली. ड्युटीवर असलेल्या कमीत कमी १७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये शिक्षक, राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबानी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

    पोटनिवडणूक कर्तव्यावर सामील झाल्यानंतर कोरोना व्हायरसने मृत्यू झालेल्या १७ शिक्षकांची दमोह प्रशासनाने यादी केली आहे. जिल्हाधिकारी कृष्णा चैतन्य म्हणाले, “आतापर्यंत आम्हाला २४ शिक्षकांच्या नातेवाईकांनी अर्ज दिले आहेत. ज्यांनी ड्युटी नंतर कोरोनामुळे आपले प्राण गमावले. यापैकी सहाजण पोटनिवडणुकीच्या कर्तव्यात सक्रियपणे सहभागी होते तर इतर संबंधित कामात गुंतले होते. आतापर्यंत १७ शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजले आहे. या शिक्षकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणाऱ्या अन्य अर्जांची आम्ही पडताळणी करीत आहोत.”

    काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे दमोहमधील पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसच्या २६ आमदारांमध्ये लोधी यांचा समावेश होता. त्यांनी पक्ष बदलला. ते म्हणाले, “जेव्हा भाजपाने कमलनाथ यांचे सरकार पाडले तेव्हा मी पक्ष बदलला.” पोटनिवडणुकीपूर्वी दामोहमध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ राजकारणी रोड शो आणि जाहीर सभांना संबोधत होते. त्यामुळे कोरोना पसरल्याचे बोलले जात आहे.