Shocking Incident In Tamil Nadu! | धक्कादायक ! ऑनलाईन क्लासमुळे नैराश्यात जाऊन अल्पवयीन मुलीने घेतला शेवटचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
इतर राज्ये
Published: Aug 21, 2021 08:00 AM

Shocking Incident In Tamil Nadu!धक्कादायक ! ऑनलाईन क्लासमुळे नैराश्यात जाऊन अल्पवयीन मुलीने घेतला शेवटचा निर्णय

Mayur Sawant
कंटेन्ट रायटर
brother and sister have tried to commit suicide by drinking poison the sister died and brother is undergoing treatment

ही घटना मागील आठवड्यात तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून एका दिवसासाठी ऑनलाईन क्लासला हजेरी लावली शकली नाही, त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने किटकनाशकांचं औषध प्राशन करून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  मदुराई – एका दिवसासाठी ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मागील आठवड्यात तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून एका दिवसासाठी ऑनलाईन क्लासला हजेरी लावू शकली नाही, त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने किटकनाशकांचं औषध प्राशन करून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान मुलीने अखेरचा श्वास घेतला.

  एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचं वयवर्ष 18 होतं. ती एका स्वायत्त महाविद्यालयात बी कॉमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मृत मुलीचं निवास स्थान कळवेलीपट्टी जवळील वादीपट्टी असं आहे. ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे तिने कीटकनाशकांचं औषध प्राशन केलं होतं. त्यानंतर तिला तात्काळ राजाजी या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राजाजी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते.

  दरम्यान, सुरूवातीला मुलीच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. परंतु अचानक तिची तब्येत खराब झाली आणि उपचारादरम्यान तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे तिने गुरूवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. तसेच अलकनल्लूर पोलीस ठाण्यात कलम 174 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

  Comments
  Advertisement
  Advertisement
  दिनदर्शिका
  २० सोमवार
  सोमवार, सप्टेंबर २०, २०२१

  पंजाबचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी शपथ घेताच जर शेतकऱ्यांवर कोणतं संकट आलं तर मी माझा गळा पुढं करेन हे केलेलं वक्तव्य योग्य आहे, असं वाटतं का?

  View Results

  Loading ... Loading ...
  Advertisement
  Advertisement
  OK

  We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.