धक्कादायक घटना! एका दिवसासाठी ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल

ही घटना मागील आठवड्यात तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून एका दिवसासाठी ऑनलाईन क्लासला हजेरी लावली शकली नाही, त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने किटकनाशकांचं औषध प्राशन करून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

    मदुराई –एका दिवसासाठी ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे अल्पवयीन मुलीने उचलले टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मागील आठवड्यात तामिळनाडूमधील मदुराई जिल्ह्यात घडली आहे. 12 ऑगस्ट रोजी 18 वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडून एका दिवसासाठी ऑनलाईन क्लासला हजेरी लावली शकली नाही, त्यामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने किटकनाशकांचं औषध प्राशन करून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान मुलीने अखेरचा श्वास घेतला.

    एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचं वयवर्ष 18 होतं. ती एका स्वायत्त महाविद्यालयात बी कॉमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. मृत मुलीचं निवास स्थान कळवेलीपट्टी जवळील वादीपट्टी असं आहे. ऑनलाईन क्लास चुकल्यामुळे तिने कीटकनाशकांचं औषध प्राशन केलं होतं. त्यानंतर तिला तात्काळ राजाजी या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. राजाजी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते.

    दरम्यान, सुरूवातीला मुलीच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. परंतु अचानक तिची तब्येत खराब झाली आणि उपचारादरम्यान तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे तिने गुरूवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. तसेच अलकनल्लूर पोलीस ठाण्यात कलम 174 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.