180 crore highway fell into the valley in an instant; The edge of the mountain collapsed

अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग 415 चा काही भाग दरीत कोसळल्याचा व्हीडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. 31 मे रोजी ही दुर्घटना घडली असली तरी सोशल नेटवर्किंगवर सध्या हा नव्याने बांधण्यात आलेला रस्ता दरीत कोसळतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये जोरदार पाऊस पडला. सततच्या पावसामुळे राजधानी इटानगरमधील इंदिरा गांधी पार्कजवळच्या डी सेक्टरमधील डोंगराचा कडा कोसळला. त्यामुळेच या डोंगरावर बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाचा एका बाजूला भाग पाहता पाहता काही क्षणांमध्ये दरीत कोसळला.

    इटानगर : अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग 415 चा काही भाग दरीत कोसळल्याचा व्हीडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. 31 मे रोजी ही दुर्घटना घडली असली तरी सोशल नेटवर्किंगवर सध्या हा नव्याने बांधण्यात आलेला रस्ता दरीत कोसळतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये जोरदार पाऊस पडला. सततच्या पावसामुळे राजधानी इटानगरमधील इंदिरा गांधी पार्कजवळच्या डी सेक्टरमधील डोंगराचा कडा कोसळला. त्यामुळेच या डोंगरावर बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाचा एका बाजूला भाग पाहता पाहता काही क्षणांमध्ये दरीत कोसळला.

    सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये डोंगरकड्यावर बांधण्यात आलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने गाड्यांची वाहतूक सुरू असतानाच दरीकडच्या बाजूचा भाग कोसळल्याचे दिसत आहे. नहारलागून आणि इटानगरला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले होते.

    या रस्त्याच्या बांधकामासाठी 180 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. हा रस्ता दोन दिवसाच्या पावसामध्ये अशाप्रकारे खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.