कौटुंबिक वादातून अंदाधुंद गोळीबार, २ जण जागीच ठार, होळीच्या दिवशी रक्तपात

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद वाढत गेला. काही वेळानंतर गावातील लोकांना थेट गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. यामुळे गावात एकच घबराट पसरली आणि नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळेनासं झालं. काही क्षणांतच या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. 

    बिहारमध्ये कौटुंबिक वादातून मोठं हत्याकांड घडल्यामुळे एकच खळबळ उडालीय. एखाद्या किरकोळ मुद्द्यावरून सुरू झालेल्या भांडणाची परिणती कशा प्रकारे मोठ्या वादात आणि हिंसाचारात होऊ शकते, हेच या घटनेच्या निमित्तानं दिसून आलंय.

    बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात दोन कुटुंबांमध्ये वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद वाढत गेला. काही वेळानंतर गावातील लोकांना थेट गोळीबाराचे आवाज ऐकू येऊ लागले. यामुळे गावात एकच घबराट पसरली आणि नेमकं काय घडतंय हे कुणालाच कळेनासं झालं. काही क्षणांतच या गोळीबारात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.

    गोंधळ शांत झाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीनं शेजारच्या शहरातील इस्पितळात दाखल केलं. रुद्रनारायण सिंग, अमरेंद्र सिंग, सुरेंद्र सिंग, मनोज कुमार सिंग आणि वीरेंद्र सिंग हे पाच जण गंभीर जखमी आहेत. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अत्यंत किरकोळ कारणासाठी दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली. त्यानंतर शब्दाने शब्द वाढत गेला आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी आपल्या बंदुका सरसावल्या. वाद वाढल्यानंतर दोन्हीकडून जोरदार फायरिंग करण्यात आलं. या एकाच कुटुंबातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या कुटुंबीयांकडे बंदुका कुठून आल्या, त्यांच्याकडे लायसन्स होतं का, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. मात्र या घटनेनं होळीच्या दिवशी गावकऱ्यांच्या रंगाचा मात्र बेरंग झाला.