भिकारी म्हणावं की लखपती म्हणावं ? भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेच्या झोपडीत सापडले चक्क २ लाख ६० हजार, इतकी रक्कम पाहून अधिकारी पडले बुचकळ्यात

राजौरीच्या नौशेरा येथे भीक मागून गुजराण करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या झोपडीत चक्क २,६०,००० रुपये सापडले(Money Found in beggar woman`s hut) आहेत.

  जम्मूच्या(Jammu) राजौरीमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. राजौरीच्या नौशेरा येथे भीक मागून गुजराण करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या झोपडीत चक्क २,६०,००० रुपये सापडले(Money Found in beggar woman`s hut) आहेत. रस्त्याच्या बाजूला झोपडीत ७० वर्षीय वृद्ध महिला गेल्या ३० वर्षापासून राहत होती. प्रशासनाने झोपडी काढून वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात नेले. तेव्हा झोपडीखाली सापडलेल्या नोटा पाहून सगळ्यांना धक्का बसला.

  ही वृद्ध महिला राजौरी उपजिल्हा, नौशहराच्या वॉर्ड क्रमांक नऊमध्ये राहते. स्थानिक लोक या वृद्ध महिलेची मदत करत होते. कधी पैसै तर कधी अन्न देऊन तिची मदत करत होते.

  राजौरी जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर राहणाऱ्या निराधार लोकांना आधार देण्यासाठी  त्यांना वृद्धाश्रमात नेण्याची मोहीम सुरू केली आहे. आश्रमातून काही लोक आले आणि त्यांनी या वृद्ध महिलेस आपल्याबरोबर घेतले.दरम्यान पालिकेच्या पथकाला घराच्या कचराकुंडीतील बॉक्समध्ये नोटा मिळाल्या.

  बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपात गेलेले नेते पुन्हा तृणमूलमध्ये परत येतील का?

  View Results

  Loading ... Loading ...

  पालिकेला रस्त्याच्या कडेला असलेली झोपडी हटविण्यास सांगितले. तेव्हा पालिकेच्या कर्मचार्‍यांनी तिथे साफसफाई सुरू केली. दरम्यान त्यांना झोपडीतून काही पैसे मिळाले. कर्मचार्‍यांना पैशाने भरलेला दुसरा बॉक्स सापडला. यानंतर बेडच्या खालीही पैसे सापडले.