प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

ओडिशामध्ये पोलिसांनी दीड कोटींचा गांजा(Ganja Seized In Odisha) पकडला आहे. आरोपी हा गांजा इतर राज्यांमध्ये पाठवणार होते.

    गेल्या दीड वर्षामध्ये कोरोनामुळे(Corona) नियमांमध्ये बदल होत असल्याने अवैध धंद्यांवरही(Illegal Business) चाप बसला होता. वाहन तपासणीसाठी अनेक ठिकाणी चेकिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध दारू, अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यात मदत झाली. अशातच ओडिशामध्ये पोलिसांनी दीड कोटींचा गांजा(Ganja Seized In Odisha) पकडला आहे. आरोपी हा गांजा इतर राज्यांमध्ये पाठवणार होते.

    ओडिशामधून दीड कोटी रुपयांचा साधारण २१ क्विंटल इतका गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे.  सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू वाहनांमधून राज्याबाहेर पाठवण्याच्या तयारीत होते.

    पोलीस अधिकारी दिलीपकुमार यांनी सांगितले की, “आर उदयगिरीमध्ये गजपती पोलिसांनी २१ क्विंटल गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.२६ जणांना अटक करण्यात आली असून यात ७ महिला आहेत.” या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.