225 liters of water stored in just 10 minutes; Unique 'Rainwater Harvesting'

दयानंद याने पीव्हीसी पाइपचा उपयोग करून हे पाणी साठवले आहे. दयानंद याने छतावर जमा होणारे पावसाचे पाणी पीवीसी पाइपाने एका ड्रममध्ये सोडले. अशा प्रकारे दयानंद याने 10 मिनिटांत 225 लीटर पाणी साठवले. पाणी वाचवण्याबरोबरच त्याने ते स्वच्छ करण्याची पद्धतही शोधून काढली. ड्रममध्ये जाणाऱ्या पाइपमध्ये त्याने फिल्टर बसवले. जेणेकरून पाण्यातील घाण गाळून स्वच्छ पाणी ड्रममध्ये जाईल.

    चेन्नई : उन्हाळ्यात बऱ्याचदा सामान्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अशातच चेन्नईच्या एका अवलियाने पाणी बचतीचा नवा फंडा वापरला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून त्याने 250 रुपयांत 10 मिनिटांत 225 लिटर पाणी वाचवले आहे. चेन्नईतल्या दयानंद कृष्णन या अवलियाने हा अभिनव प्रयोग केला.

    दयानंद याने पीव्हीसी पाइपचा उपयोग करून हे पाणी साठवले आहे. दयानंद याने छतावर जमा होणारे पावसाचे पाणी पीवीसी पाइपाने एका ड्रममध्ये सोडले. अशा प्रकारे दयानंद याने 10 मिनिटांत 225 लीटर पाणी साठवले. पाणी वाचवण्याबरोबरच त्याने ते स्वच्छ करण्याची पद्धतही शोधून काढली. ड्रममध्ये जाणाऱ्या पाइपमध्ये त्याने फिल्टर बसवले. जेणेकरून पाण्यातील घाण गाळून स्वच्छ पाणी ड्रममध्ये जाईल.

    चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यातच दयानंद कृष्णन याने राबवलेला प्रयोग इतरांसाठी आदर्श ठरत आहे. या पाण्यापासून लोक कपडे धुणे आणि भांडी घासण्याबरोबरच इतर कामे करू शकतात, तर दुसरीकडे सबरी टेरेस या सोसायटीतील 56 कुटुंबीय रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून एका तासात 30 हजार लिटर पाणी साठवतात. त्यामुळे दयानंद याने राबवलेला हा प्रयोग म्हणावा तेवढा खर्चिक नसला तरी पाणी साठवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.