२५,००० व्होल्टेजची ओव्हरहेड वायर चोरीला; रेल्वे प्रशासनात खळबळ

पश्चिम-मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त प्रदीप कुमार गुप्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते स्वतः कोटा येथे गेले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या ओव्हरहेड वायरची किंमत १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले

    कोटा : पश्चिम-मध्य रेल्वेच्या कोटा रेल्वे विभागात रेल्वेची ओव्हरहेड वायर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोटा विभागातील नव्याने उभारलेल्या रामगंजमंडी-भोपाळ रेल्वे मार्गावर ही घटना घडली. झालरापाटन-जुनाखेडा स्थानकांदरम्यानची २५ हजार व्होल्टेजची ओव्हरहेड वायर चोरट्यांनी कापून लंपास केली.

    पश्चिम-मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त प्रदीप कुमार गुप्ता यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ते स्वतः कोटा येथे गेले. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणात रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या ओव्हरहेड वायरची किंमत १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

    या प्रकरणी रामगंजमंडी रेल्वे पोलिसांनी सांगितले की, विद्युत प्रवाह सुरू असताना, चोरट्यांनी वायर कापून लंपास केली. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांची धरपकड सुरू केली आहे. राजस्थान पोलिस दलातील असनावर पोलिस ठाण्याचे सहकार्य घेत आहोत.