तिसऱ्या लाटेत दररोज ५ लाख रुग्ण संक्रमित होण्याची शक्यता, पुढचे तीन महिने धोक्याचे, आयआयटी कानपूरचा इशारा…

कोरोना व्हायरसची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे, तिसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे पाच लाख रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत.

    कानपूर : कोरोना व्हायरसची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे, तिसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे पाच लाख रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत.

    आयआयटी कानपूरच्या अहवालातील तीन महत्त्वाच्या बाबी

    या अहवालात तीन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. १५ जुलैपर्यंत संपूर्ण देशातील लॉकडाऊन उठवला जाण्याची शक्यता आहे. अनलॉक झाल्यानंतर जानेवारीत ज्याप्रमाणे परिस्थिती होती, तशीच परिस्थिती जुलैतही निर्माण होण्याची शक्यता आहे. अनलॉकमध्येही नागरिकांनी कोरोनाकडे दुर्लक्ष केले, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत, सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय प्रवास केला, तर हा बेजबाबदारपणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये उच्चांकी रुग्ण आढळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या विषयातील जाणकारांनीही याला दुजोरा दिला आहे.

    व्हायरसचे स्वरुप बदलेले असेल तर जास्त घातक परिणामांची शक्यता

    या अहवालानुसार सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये कोरोनाची स्थिती अधिकग भयावह होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या नव्या म्यूटेंटसह, तिसरी लाट आली, तर त्याची परिणामकता अधिक घातक असण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे. कदाचित ऑग्सटमध्येच तिसऱ्या लाटेचे रुग्ण सापडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगली, मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले तर या लाटेची तीव्रता कमी होऊ शकेल. तसेच लसीकरणामुळेही कोरोनाचा प्रभाव कमी होईल. सर्व देशवासियांचे लसीकरण वेगात झाले तर तिसऱ्या लाटेची तीव्रता नोव्हेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे.