मतमोजणीसाठी कुठल्या राज्यात कशी तयारी? बरोबर ८ वाजता सुरु होणार मतमोजणी, जाणून घ्या तपशील

गेले काही आठवडे देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचा निकाल स्पष्ट व्हायला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. यासाठी सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये मतमोजणी केंद्रं तयार असून प्रत्येक राज्याने वेगवेगळ्या पद्धतीनं ही तयारी केलीय.

  पश्चिम बंगालमध्ये काही वेळापूर्वीच मतमोजणी अधिकारी केंद्रावर दाखल व्हायला सुरुवात झालीय. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कोरोनाने उचल खाल्ल्याने सोशल डिन्टन्सिंगचं पालन करून मतमोजणी केली जाणार आहे. पश्चिम बंगालच्या निकालांकडे देशवासियांचं सर्वाधिक लक्ष असणार आहे. तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्ता राखणार की भाजप मुसंडी मारणार याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेलीय.

  आसामच्या दिब्रुगढमध्ये दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे.  दिब्रुगढ गव्हर्नमेंट बॉईज सेकंडरी स्कूल आणि डेप्युटी कमिशनर ऑफिस या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

  तमिळनाडूमध्ये मतमोजणीची जय्यद तयारी करण्यात आलीय. मतमोजणी अधिकारी केंद्रांवर दाखल झाले असून बरोबर ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

  तर केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये स्ट्राँग रुम उभारण्यात आलीय. राज्यातील सर्व मतमोजमीच्या प्रक्रियेवर नियंत्रण राखण्याचं आणि लक्ष ठेवण्याचं काम या ठिकाणाहून सुरू राहणार आहे.

  तर पुदुच्चेरीमध्येदेखील ३० जागांच्या मतमोजणीला सुरुवात होतेय. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.