Disputes over playing free fire games in mobile; Beating children who play games

मध्यप्रदेशमधील छतरपूरमध्ये ऑनलाईन गेममध्ये कथितरीत्या 40,000 रुपये गमावल्यानंतर घाबरलेल्या एका 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत डीएसपी शशांक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये या मुलाने लिहिले आहे की, त्याने आईच्या बँक खात्यामधून 40 हजार रुपये काढले. त्यानंतर हे पैसे त्याने फ्री फायर नावाचा ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये वाया घालवले. दरम्यान, मुलाने या कृत्याबाबत आईची माफी मागितली असून, या कृत्यामुळे खजील होऊन आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.

    भोपाळ : मध्यप्रदेशमधील छतरपूरमध्ये ऑनलाईन गेममध्ये कथितरीत्या 40,000 रुपये गमावल्यानंतर घाबरलेल्या एका 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत डीएसपी शशांक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार सहावीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये या मुलाने लिहिले आहे की, त्याने आईच्या बँक खात्यामधून 40 हजार रुपये काढले. त्यानंतर हे पैसे त्याने फ्री फायर नावाचा ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये वाया घालवले. दरम्यान, मुलाने या कृत्याबाबत आईची माफी मागितली असून, या कृत्यामुळे खजील होऊन आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने या चिठ्ठीत म्हटले आहे.

    पोलिसांनी सांगितले की, मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई-वडील घरी नव्हते. या विद्यार्थ्याची आई मध्यप्रदेशच्या आरोग्य विभागामध्ये नर्स आहे. ही घटना घडली तेव्हा ती जिल्हा रुग्णालयामध्ये होती. पोलिसांनी सांगितले की, पैशांच्या व्यवहाराबाबत या मुलाच्या आईच्या फोनवर मेसेज आला होता. त्यानंतर तिने मुलाला फटकारले होते. त्यानंतर या मुलाने स्वत:ला खोलीत बंद करून घेतले होते. काही वेळाने या मुलाची मोठी बहीण आली तेव्हा तिला ती खोली आतून बंद असल्याचे दिसून आले. तिने याची माहिती आई-वडिलांना दिली.

    दरम्यान, त्या खोलीचा दरवाजा तोडला असता सदर मुलगा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथे त्याल मृत घोषित केले. आता पोलीस हा मुलगा स्वत:हून या खेळामध्ये पैसे लावत होता की, त्याला कुणी पैशांसाठी धमकावत होता, याबाबत तपास करत आहेत.

    यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये मध्यप्रदेशमधील सागर जिल्ह्यातील ढाना भागात अशाच प्रकारची घटना घडली होती. तिथे वडिलांनी फ्री फायर गेम खेळण्याचे व्यसन लागलेल्या एका मुलाकडून मोबाईल काढून घेतल्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.