4,250 crore worth of radioactive material seized in Calcutta

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शैलेन कर्माकर आणि असित घोष यांचा समावेश आहे. शैलेर कर्माकर हा लेफ्टिनंट विश्वनाथ कर्माकर यांचा मुलगा असून हुगळीचा रहिवासी आहे. तर असित घोष देखील हुगळीचा असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीला आरोपींकडून करड्या रंगाचे चार दगडी तुकडे जप्त करण्यात आले. यांचे वजन 250 ग्रॅम इतके असून ते दगड अंधारात चमकत असल्याचे लक्षात आले.

    कोलकाता : कोलकाता विमानतळावर सीआयडीच्या पथकाला मोठे यश आले आहे. सीआयडीने तब्बल 4,250 कोटी रुपये किमतीचा दुर्मीळ किरणोत्सारी पदार्थ (रेडिओ अॅक्टीव्ह मेटल) जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

    अटक करण्यात आलेल्यांमध्ये शैलेन कर्माकर आणि असित घोष यांचा समावेश आहे. शैलेर कर्माकर हा लेफ्टिनंट विश्वनाथ कर्माकर यांचा मुलगा असून हुगळीचा रहिवासी आहे. तर असित घोष देखील हुगळीचा असल्याची माहिती समोर आली आहे. सीआयडीला आरोपींकडून करड्या रंगाचे चार दगडी तुकडे जप्त करण्यात आले. यांचे वजन 250 ग्रॅम इतके असून ते दगड अंधारात चमकत असल्याचे लक्षात आले.

    हे दगड किरणोत्सारी असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेला पदार्थ कॅलिफोर्नियम असल्याची शक्यता आहे. जो एक किरणोत्सारी पदार्थ असून भारतीय चलनानुसार कॅलिफोर्नियमची किंमत प्रति ग्रॅम तब्बल 17 कोटी रुपये इतकी आहे.