paracetamol

कुमाऊ प्रांतामध्ये मागील काही काळापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथे एका महिन्यात तब्बल पाच कोटी पॅरासिटामॉल (Paracetamol) गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे.

    कोरोनामुळे(Corona) देशात सगळीकडे परिस्थिती गंभीर आहे. उत्तराखंडमधील कुमाऊ प्रांतामध्ये मागील काही काळापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथे एका महिन्यात तब्बल पाच कोटी पॅरासिटामॉल(Paracetamol) गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनावर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांच्या विक्रीचे आकडे दोन कोटींच्या पुढे गेले आहेत.

    अनेक डॉक्टर कोरोना रुग्णांसाठी एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन औषधच लिहून देत आहेत. तसेच अनेक ठिकाणी साडेसहाशे एमजी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचाही सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच बी कॉम्पलेक्स, झिंकबरोबरच, क जीवनसत्व आणि आइवरमेक्टिनच्या गोळ्याही लिहून दिल्या जात आहेत.

    बी कॉम्पलेक्स झिंकबरोबरच क जीवनसत्वाच्या दोन दोन कोटी गोळ्यांची विक्री झाली आहे. त्याबरोबरच आइवरमेक्टिनच्या ५० लाख किंमतीच्या गोळ्या विकल्या गेल्यात. कुमाऊंमध्ये ड जीवनसत्वाची पाकिटं आणि गोळ्यांची पाच लाखांच्या आसपास विक्री झालीय. श्वसनासंदर्भातील त्रासांसाठी इन्हेलरचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टर देत असल्याने त्याचीही विक्री वाढली आहे.

    कोरोना रुग्णांवरील उपचारादम्यान रक्त पातळ करणारं इंजेक्शन दिलं जातं. मात्र या इंजेक्शनची आता कमतरता उत्तराखंडमधील कुमाऊंमध्ये जाणवू लागलीआहे. त्याचबोरबरच एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांचीही कमतरता जाणवू लागली आहे. कोरोनावरील उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषध आयुष ६४ आणि पतंजलीच्या कोरोनिल गोळ्याही बाजारात उपलब्ध नाहीत.